वरणगाव – शहरातील गांधी चौक परिसरात घर मालक घरा बाहेर झोपलेले असताना दार उघडेच असल्याचा फायदा उचलत एकाने मोबाईल चोरल्याची घटना येथे घडली घटनेचा तपास करून अलगद चोराला जाळ्यात अडकवले

या बाबत माहिती अशी की शहरातील गांधी चौक परिसरातील रहिवाशी बंडू संपत चौधरी हे दि २९ शुक्रवार रोजी रात्रीच्या वेळी आपल्या घरा बाहेर बाज टाकून झोपले होते घराचे दार उघडे असल्याचा फायदा घेत चोराने घरातील सॅमसंग कंपनीचा पंधराशे रुपये किंमतीचा किंमतीचा मोबाईल चोरून घेऊन गेला होता या बाबात वरणगाव पोलीसात अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या तपास कामी पोलीसानी पथक नेमून त्यांनी ठिकठिकणचे लावलेल्या सिसी कॅमेऱ्यातील चित्रफीत पाहून शहरातील विशाल उर्फ गोलू दिलीप माळी याला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेत त्याची चौकशी केल्याने त्याने मोबाईल चोरी केल्याची कबुली देत त्याच्या जवळील चोरीचा मोबाईल काढून दिल्याने त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या पथकात पो हे कॉ अतुल बोदडे , सुकराम सावकारे , पराग दुसाने , ईश्वर तायडे यांनी काम केले तर घटनेचा तपास सह फौजदार नागेंद्र तायडे हे करीत आहे


