भुसावळात पथनाटयाद्वारे विविध भागात मतदान जनजागृती अभियानास प्रारंभ : मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा दिला संदेश :

: भुसावळ – मतदारांनी जागृत होऊन मतदानाच्या दिवशी मतदान करून मतदानाचा हक्क बजवावा असा संदेश पथनाटयाद्वारे देवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली . वववआज शुक्रवार रोजी सकाळी भुसावळ शहरामध्ये विविध ठिकाणी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी भुसावळ येथे स्वीप अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विद्यार्थ्यांनी शहरातील विविध ठिकाणी आपल्या पथनाट्याद्वारे मतदार जागृत व्हावा याबद्दल कार्यक्रम सादर केले. यावेळी शहरातील अष्टभुजा मंदिर, रजा टॉवर, बस स्टॅन्ड तसेच विविध नामांकित चौकामध्ये कार्यक्रम सादर केले.
या कार्यक्रमास प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील,नायब तहसीलदार अंगद असटकर तसेच गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे हे उपस्थित होते .