भुसावळ – रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या मागणीचा विचार करता रद्द करण्यात आलेली बडनेरा- नाशिक- बडनेरा मेमू दिनांक 24.03.2024 पासून आपल्या नियोजित वेळेत धावणार आहे.
विवरण पुढील प्रमाणे
*गाडी क्रमांक 01212 बडनेरा नाशिक मेमू प्रवास सुरू दिनांक 24.03.2024 पासून आपल्या नियोजित वेळेत बडनेरा स्थानकापासून सुटेल.
*गाडी क्रमांक 01211 नाशिक बडनेरा मेमू प्रवास सुरू दिनांक 24.03.2024 पासून आपल्या नियोजित वेळेत नाशिक स्थानकापासून सुटेल.
प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी, आणि या सेवाचा लाभ घ्यावा.



