धक्कादायक : भुसावळात प्रेमी युगलाची आत्महत्या ;

भुसावळ – येथील टिंबर मार्केट बालाजी मंदिर जवळील राहुल नगर येथिल काजल गौतम सपकाळे शनिवार रोजी सकाळी विषप्राशन करून आपले जीवन संपविले तर प्रियसीचे निधन झाल्याचे समजताच हा धक्का सहन न झालेल्या कुणाल मनोज भालेराव याने थेट तापी नदी गाठली व तापीच्या पुलावरून उडी घेत आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना येथे उघडकीस आली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे . . प्रेमविवाह करून आपल्या सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या प्रेमी युगुलांच्या आत्महत्त्येच्या टोकाच्या निर्णयानंतर भुसावळ शहरच नव्हे तर जिल्हा हादराला आहे.. या घटनेमुळे राहुलनगर परिसर हळहळला आहे

शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथे राहणारा कुणाल मनोज भालेराव ( वय २३) याचे काजल गौतम सपकाळे ( वय २० ) या तरूणीवर प्रेम होते. दोघांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच हे दोन्ही विवाहबद्ध होणार होते. शनिवारी सकाळी किरकोळ वादातून काजल सपकाळे हिने विषारी द्रव प्राशनकेल्याने तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली . 

काजलचा मृत्यू झाल्याचे कळताच कुणाल मनोज भालेराव याने तापी नदीच्या पुलावरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. रात्री उशीरा त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.