भुसावळ – भुसावळातील सक्षम नारी फाउंडेशनने बोदवड येथील मनोरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या आत्मसन्मान फ़ाउंडेशनला रुग्णांनाने आण करण्यासाठी भरीव सहकार्य म्हणून मारुती Ecco गाडी भेट देवून कौतुकास्पद कार्य केले आहे सक्षम नारीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बोदवड येथे आत्मसन्मान फ़ाउंडेशन गेल्या दहा वर्षापासुन मनोरुग्णांसाठी कार्य करीत आहे. कित्येक निराधार, रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांना ते आपल्या संस्थेमध्ये नेवून त्यांची योग्य तो उपचार करून त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करतात. ह्या कार्यासाठी त्यांना रुग्णवाहिकेची गरज होती. सक्षम नारी फ़ाउंडेशनने हा प्रकल्प मनाशी धरून आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी त्यांच्या दशक पूर्ती कार्यक्रमात एक मारुती Ecco गाडी आत्मसन्मान फ़ाउंडेशन ला भेट म्हणून दिली. ज्यामुळे ते रूग्णांना व्यवस्थित आणू शकतील.
या उपक्रमासाठी पल्लवी कामेरकर, अनघा काळे, संगीता नायर, सुंदरकांड मंडळ, अॅड. राय, डॉ, शंकर अंबुस्कर, डॉ शंतनू साहू, डॉ चारूलता पाटील यांनी आर्थिक सहाय्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशन संस्थापक अध्यक्षा डॉ, सुवर्णा गाडेकर, डॉ रंजना शिंगणे, डॉ. वैशाली रामवंशी, सुनंदा डांगे, पल्लवी अंबाडे, सुनीता जोशी, वंदना कांबळे, वंदना हंस, गायत्री विसपुते, शीतल भालेराव, संघमित्रा ठाकने, शीतल मोरे, संगीता जगताप, महेश भालेराव, दिपक गवळी, संजय पाटील, वासुदेव पाटील आणि शशिकांत गवळी यानी सहकार्य केले.



