मुंबई – मध्य रेल्वेच्या खर्डी ते उंबरमाळी स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे कसाराकडे जाणारी जाणारी एक्सप्रेस सेवा तर,उपनगरीय लोकल सेवाचे वेळापत्रक कोलमडले होते.

मात्र, तासाभरात जोड इंजिन पाठवून मालगाडी हलविण्यात आली. परंतु, कसारामध्ये पुन्हा जोड इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेला तीन लोकल फेऱ्या रद्द करावा लागल्या तर दोन लोकल सेवा शॉर्ट टर्मिनेट केला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी दुपारी २.२५ वाजताच्या सुमारास वाजता कसाराच्या दिशेने जाणाऱ्या ४२ डब्याचा मालगाडीचा इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता. त्यामुळे मालगाडी जागीच उभी होती. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी पोहचले होते.
मात्र, त्यानंतर मध्य रेल्वेने दुपारी ३.५८ वाजता जोड इंजिन पाठवून मालगाडीला मार्गस्थ केली. मात्र, त्यानंतर कसारा जवळ मालगाडी येताच दुपारी ४. २८ वाजता जोड इंजिनमध्ये सुद्धा तांत्रिक बिघाडा झाला. त्यामुळे पुन्हा एकदा मालगाडी रखडून पडली. या घटनेमुळे कसाराच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आणि मेल एक्स्प्रेस एकामेकामागे एका खोळंबल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहे.
विशेष म्हणजे दोनदा मालगाडीचे इंजिनमध्ये तांत्रिक बिगडा आल्यामुळे मध्य रेल्वेला तीन लोकल फेऱ्या रद्द तर दोन लोकल फेऱ्या शॉर्ट टर्मिनेट करण्याची नामुष्की आली आहे. ह्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लोकल सेवांचा वेळापत्रकांवर मोठा परिणाम दिसून आला आहे. ह्या बिघाडामुळे संध्याकाळी उशिरापर्यत मध्य रेल्वेची उपनगरीय लोकल वाहतूक १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे.
राजधानी एक्सप्रेसला फटका –
या मालगाडीच्या तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन क्रमांक २२२२१ राजधानी एक्सप्रेस, ट्रेन क्रमांक २०७०६ जालना वंदे भारत एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक २२१०२ मुंबई एलटीटी साप्ताहिक एक्सप्रेस अडकून पडल्या होत्या, त्यामुळे मेल- एक्सप्रेसच्या प्रवाशांचे हाल झाले आहेत


