भुसावळ –
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, विद्यार्थ्यांची अध्ययन गती वाढविणे, शिकण्यात तंत्रज्ञानाचा वापर करणे या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन दिले तर शिक्षकांचे काम अर्ध्यावर, परिणाम दुप्पट, तर आनंद तिप्पट मिळेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना आव्हानात्मक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केले.

स्टार प्रोजेक्ट्स अंतर्गत पुणे येथील शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथील डायटच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. हे प्रशिक्षण बियाणी मिलीटरी स्कूल भुसावळ येथे सुरू आहे.
विद्याध्यर्थ्यांमध्ये एकविसाव्या
शतकातील कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी केवळ वर्गात शिकवणे एवढीच कृती पुरेशी ठरणार नाही. अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करणे यासाठी योग्य प्रकारच्या अध्ययन प्रक्रिया वर्गामध्ये कशा वापराव्यात याबाबतची कौशल्ये शिक्षकांनी आत्मसात करायला हवीत या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण विभागातर्फे संपूर्ण राज्यात राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत या विभागीय
प्रशिक्षणाचे आयोजन 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर डिसेंबर या कालावधीत नाशिक येथील सपकाळ नॉलेज हब येथे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व शाळांपर्यंत, सर्व शिक्षकांपर्यंत व शिक्षकांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी पर्यंत पोहोचणे व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसोबतच, विद्यार्थ्यांना सुजाण, जबाबदार नागरिक बनवणे, तसेच आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.
भुसावळ तालुक्यातील शिक्षकांना ९ सुलभक या प्रशिक्षणात मार्गदर्शन करणार आहेत.
उद्घाटन प्रसंगी विस्तार अधिकारी बी डी धाडी , तुषार प्रधान , केंद्रप्रमुख आशिक हूसेन , विषयतज्ञ शिक्षक सचिन पाटील , संजय गायकवाड , निलेश लखोटे यांनी परिश्रम घेतले.
तीन कुलात नऊ सुलभक
प्राथमिक खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 150 शिक्षकांसाठी तीन पूल तयार करण्यात आले आहे या तीन कुलांमध्ये एस एस अहिरे सुनील वानखेडे, नितीन भालेराव अशोक तायडे,गुणवंत पाटील, कैलास पाटील, निलेश पाटील, राहूल भारंबे , अश्फाक खान
२१ व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी केवळ वर्गात शिकवणे एवढीच कृती पुरेशी ठरणार नाही. अध्यापन कौशल्यात काळानुरूप बदल करणे यासाठी योग्य प्रकारच्या अध्ययन प्रक्रिया वर्गामध्ये कशा वापराव्यात याबाबतची कौशल्ये शिक्षकांनी आत्मसात करायला हवीत या उद्देशाने या शिबिराचे आयोजन शिक्षण विभागातर्फे राज्यात संपूर्ण करण्यात आले आहे.उपो




