जळगाव – येथील लिलाई बालगृहामध्ये रक्षाबंधनाचा सोहळा ग्लोबल फाउंडेशन जळगांव तर्फे साजरा करण्यात आला..

रक्षाबंधनानिमित्त ग्लोबल फाउंडेशन जळगाव यांच्याकडून आई-वडील बहिणी पासून दूर असलेल्या बालगृहातील बालकांना मुलांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून मायेचा स्पर्श देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी बालगृहातील बालकांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधून तसेच मुलांना शिक्षण उपयोगी साहित्य व खाऊ देऊन साजरा केला.
प्रसंगी ग्लोबल फाउंडेशन जळगाव च्या वतीने सौ श्रद्धा नेवे, सौ पल्लवी पाटील, सौ वैशाली पठाडे, सौ विद्या मोरनकर, सौ अश्विनी पाटील, सौ छाया पाटील, सौ जयश्री पाटील, सौ नीलम अंभोरे, सौ सविता सोनार, सौ रुपाली नेवे. या सर्वांनी मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न केला हा कार्यक्रम सफल करण्या साठी श्री संदीप पाटील, गिरीश नेवे, विलास नेवे व लीलाई बालगृहाचे अध्यक्ष श्री विठ्ठल पाटील सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले


