जळगाव लिनेस क्लबला डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स मध्ये बेस्ट क्लबचा पुरस्कार

जळगाव — लातूर येथे झालेल्या डिस्ट्रिक कॉन्फरन्स मध्ये विविध दहा जिल्ह्यातील 25 क्लबमधून जळगाव लिनेस क्लब ला बेस्ट क्लबचा प्रथम पुरस्कार मिळाला.तसेच क्लब अध्यक्षा दर्शना ललवाणी यांना बेस्ट प्रेसिडेंट चा प्रथम पुरस्कार मिळाला.तसेच शैला छोरीया बेस्ट सेक्रेटरी, कोमल राका बेस्ट ट्रेझरर असे एकूण 11 पुरस्कारांनी क्लबला गौरवांवित करण्यात आले. मिळालेले हे पुरस्कार लिनेस क्लबच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याची पावती आहे .या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सला पीडीपी लताजी बनवट, अनिता कांकरिया, संगीता श्रीश्रीमाळ प्रियादारा संध्या कांकरिया आधी सदस्य उपस्थित होते.