भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलचे भारत स्काऊट आणि गाईड यांचे इंटरनॅशनल सांस्कृतिक जांभोरी कर्नाटक येथील अल्वाज इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन विद्यानगरी दक्षिण कनडा कर्नाटका राज्यात दिनांक 21 ते 27 रोजी संपन्न होणार आहे, या कॅम्पसाठी दहा विद्यार्थी व दहा विद्यार्थिनी तसेच स्काऊट गाईडचे कॅप्टन अनिता कोळी आणि स्काऊट गाईड शिक्षक निलेश फंड,विजय संकट हे विद्यार्थ्यांसोबत नुकतेच कर्नाटक साठी रवाना झाले आहेत, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका निना कटलर यांनी जांबोरी कॅम्प साठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या. जळगाव जिल्ह्यातून फक्त ताप्ती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र राज्यातून पुणे ,नाशिक, परभणी येथून इतर शाळा जाणार आहे. भारतातून स्काऊट गाईड चे विद्यार्थी तसेच भारताबाहेरील विद्यार्थी सुद्धा या शिबिरासाठी येणार आहे. हे शिबिर चार वर्षातून एकदा होत असते. संपूर्ण भारतातून एकूण आठ ते दहा हजार विद्यार्थी या शिबिरासाठी रवाणा झाले आहे. ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या शिबिरात फोक डान्स, योगा, मॅरेथॉन, स्काऊट गाईड स्किल, पोस्टर पेंटिंग, एडवेंचर या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होणार आहेत.



