भुसावळ : भुसावळ येथील राम मंदीर परिसरात दि. १० डिसेबर रोजी अंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटना नवी दिल्ली चे संस्थापक दिलीप मोहिते व महाराष्ट्र राज्याध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्या विद्यमानाने भुसावळ तालुका अध्यक्ष विनोद शर्मा यांनी सर्व जाती धर्माचा लोकांचा उपस्थितीत कार्यकमाचे आयोजन केले. संविधानाचे जनक विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यकमाची शुरुआत करण्यात आली.

व्यासपीठावर प्रमुख पाहुने म्हणून जयप्रकाश शुक्ला, जे. बी. कोटेचा, श्रीमती ज्योती शर्मा, श्रीमती बबीता शर्मा व श्रीमती सरिताताई चौक उपस्थित होते. प्रमुख अतिथी जयप्रकाश शुक्ला यांनी मानवाधिकार दिवसची सविस्तर माहिती तसेच संबोधन केले.
कार्यकमाचे संचालन पत्रकार अखिलेशकुमार धिमान यांने तर आभार जे.बी. कोटेचा यांनी व्यक्त केले.
सदर कार्यकमास सुनील ठाकुर,संतोष जगताप,सुनील दाभाडे,मुरलीधर पाटील,पुंजो सोनवणे आदी मंडळी उपस्थित होते.


