भुसावळ – भुसावळ शहर कॉग्रेस कमिटीचे जेष्ठ पदाधिकारी, कार्यकतै, माजी आमदार, माजी नगरसेवक यांना महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी व जळगाव जिल्हा कॉग्रेसच्या सुचनेनुसार भारत जोडो यात्रा हि महाराष्ट्रात दिनांक 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर प्रर्यन्त राज्यातून पायी प्रवास करणार असुन ज्या कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सेक्युलर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर दिनांक 27 नोव्हेबर पर्यंत भुसावळ शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष रविंद्र निकम यांचेकडे जमा करावे कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना सुरक्षा असल्यामुळे पास शिवाय भारत जोडो यात्रेत सहभागी होता येणार नाही. कृपया नोंद घ्यावी असेही आ आवाहन रविंद्र निकम अध्यक्ष भुसावळ शहर कॉग्रेस कमिटी यांनी केले आहे .



