श्री शारदा माध्यमिक विद्यालयात जागतिक अंतराळ सप्ताह संपन्न : हर घर बालकलाम अंतर्गत विविध कार्यक्रम :

भुसावळ – ए .पी.जे अब्दुल कलाम जयंती निमित्ताने , विज्ञान प्रसार नेटवर्क ऑफ सायन्स क्लब च्या अंतर्गत ए.पी.जे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट , नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर्स सायंटिस्ट, इंडिया. जळगाव डिस्ट्रिक्ट सायन्स टीचर असोसिएशन, महाराष्ट्र. यांनी आयोजित केलेले उपक्रम 4 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर हा सप्ताह World Space Week म्हणून साजरा करायचा आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा आयोजन हर घर बालकलाम या उपक्रमां अंतर्गत श्री शारदा माध्यमिक विद्यालय ,दीपनगर. तालुका – भुसावळ , जिल्हा – जळगाव , यांनी चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा , मॉडेल मेकिंग स्पर्धा , तसेच Quiz Compitition हे प्रोग्राम घेण्यात आले. समारोप या विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडेल , चित्रकला आणि निबंध याची मांडणी करून प्रदर्शन ( Exhibition) भरवण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री जी.डी चौधरी सर यांनी भूषविले त्यांनी विद्यार्थ्यांना अवकाश याबाबत मार्गदर्शन केले. या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना गोल्ड , सिल्वर व ब्राझ मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
संशोधन म्हणजे विज्ञानापुरता मर्यादित नसून दररोजच्या जीवनामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये संशोधनाची गरज आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूनच विचार करायला हवा असे पर्यवेक्षक श्री जे.बी पाटील सर यांनी वक्तव्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा पाटील यांनी तर आभार सौ रूपाली राणे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीते साठी विज्ञान मंडळ व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.