वरणगावात डेंगू, मलेरिया टाईफाईडचे रुग्ण वाढत असल्याने धूर फवारणी करा – शिवसेनेची मागणी : मुख्याधिकारी यांना दिले निवेदन :

भुसावळ – वरणगाव शहरात मलेरिया, डेंगू, टाईफाईडचे रुग्ण संख्या वाढत असल्याने नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ यावर उपाय योजना म्हणून गटारीवर धूर फवारणी करण्यात यावी,अशी मागणी शिवसेना वरणगाव शहराच्यावतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन आज दि.19 ऑगष्ट सोमवारी करण्यात आली.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वरणगावात सध्या मोठ्या प्रमाणावर मलेरिया, डेंगू, टाईफाईडचे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या पावसाळी दिवस असल्याने गटारीवर डासांची उत्पत्ती वाढली आहे. नगरपरिषदने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गावात धूर फवारणी करावी जेणेकरून डासांना आळा बसेल आणि रुग्ण संख्याचे प्रमाण कमी होईल.

तसेच कचरा घंटागाड्या दररोज काही भागात जात नसल्याने त्या भागात कचरा रस्त्यावर पडून दुर्गंधी पसरली आहे. काही घंटा गाड्यांचा ट्रॉलीचा पत्रा जीर्ण झाल्याने कचरा भरलेल्या ट्रॉलीतून कचरा रस्त्यावर पळतो. जीर्ण झालेल्या गाड्यांची दुरुस्ती करावी आणि रस्त्यावर पडणारा कचरा थांबबाबा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनाचा विचार करून पुढील उपाययोजना करावी अन्यथा शिवसेनेतर्फे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देतांना शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी, शहर समन्वयक विलास वंजारी, महिला संघटिका योगिता सोनार, उप शहरप्रमुख सुखदेव धनगर, अशोक शर्मा, राम शेटे, सुनील भोई, युवासेना जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, शिवा भोई, निलेश काळे, विजय भोई, सुनील देवघाटोळे, आबा सोनार, राहुल वंजारी, वैभव लोखंडे, दिपक शेडके, अजय शेटे, शेख अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.