भुसावळ मध्ये रोटरीचा क्षेत्रीय मेळावा संपन्न :

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे नुकताच शहरातील प्रभाकर हॉल येथे जळगाव जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबच्या आगामी पदाधिकाऱ्यांचा प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला.नवीन रोटरी वर्ष १ जुलै पासून सुरू होत असून, आगामी वर्षात पदाधिकाऱ्यांनी करावयाची कार्य व त्यांच्या जबाबदाऱ्या याबद्दल रोटरीचे माजी प्रांतपाल शब्बीर शाकीर, महेश मोकाळकर आणि राजीव शर्मा यांनी मार्गदर्शन केले, तर डॉ राहुल कुलकर्णी यांनी तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. सदर कार्यक्रमात जिल्हाभरातील १७ रोटरी क्लबचे १२५ पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभाग नोंदवला. या मेळाव्याचे मुख्य संयोजक रोटरीचे आगामी अध्यक्ष डॉ मकरंद चांदवडकर तर सह संयोजक आगामी सचिव आर्किटेक्ट सन्मीत पोतदार व माजी अध्यक्ष चेतन पाटील हे होते. यशस्वितेसाठी रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष हर्विंदरसिंह ठेठी, सचिव आशिष अग्रवाल,विकास पाचपांडे तसेच सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.