जनमत प्रतिष्ठान कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न :


जळगाव – येथील मुक्ताईनगर प्रेम नगर परिसरात 10वी व 12वी गुणवंत 50 विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार समारंभ पार पडला, त्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव शहराचे महापौर सौ जयश्री महाजन या उपस्थित होत्या यावेळी बोलताना म्हणाले की आयुष्यात आपण खूप संघर्ष करून आई-वडिलांचे ऋण आपण फेडायला पाहिजे ते आपल्यासाठी किती काबाडकष्ट करतात याची जाणीव आपण ठेवायला हवी, अध्यक्षस्थानी नगरसेविका सौ ,नीता ताई सोनवणे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

, गुणवत्ता विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले,तसेच कार्यक्रमाप्रसंगी पोलीस संघटनेचे जिल्हाप्रमुख कुणाल मोरे ऍड हेमंत दाभाडे ,शिरीष पाटील सर व हर्षाली पाटील, संपादक हेमंत वैद्य,किशोर पाटील सर,बाळू नाले ,किरण पाटील राकेश भाई,जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक विजय वानखेडे यांनी केले,