जळगाव: भुसावळ शहरात तब्बल १६ ठिकाणी महसूल विभागाच्या अधिकार्यांनी छापे टाकत सुमारे ५०२ ब्रॉस वाळूच्या साठ्यांचे पंचनामे केले. पंचनामा करून ताबे पावती करून संबंधितांच्या ताब्यात वाळू सोपंविली आहे, सर्व जणांना कारणे दाखवा नोटिस बजावली जाणार आहे.महसूल विभागाचे जिल्हा गौण खनीज अधिकारी दीपक चव्हाण, नायब तहसीलदार एस.जे. इंगळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली, यामुळे अवैध वाळूचा साठा करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यानी शहरातील वाळू साठ्यांची माहिती काढली होती व शहरातील अवैध साठ्याबाबत महसूलकडे तक्रार केली होती. त्यानंतर जळगाव जिल्हा गौण खनिज अधिकारी चव्हाण, नायब तहसीलदार एस.जे. इंगळे, मंडळाधिकारी सतीश इंगळे, तलाठी पवन नवगाळे विनोद बारी, दिलीप पवार, भगवान शिरसाठ, महेश सपकाळे, मिलींद तायडे, जितू चौधरी यांच्या पथकाने पाहाणी मोहिम सुरू केली. यामुूळे शहरातील ठेकेदार, दलाल, वाळूचा काळा बाजार करणार्यांमध्ये खळबळ उडाली. पोलिस सोबत असतांना मिळालेल्या माहितीवर पथकातील अधिकार्यांनी प्रत्यक्ष जाऊन पहाणी केली. यात काही जणांनी वाळूचे मोठ्या प्रमाणावर साठे करून ठेवले होते तर काही ठिकाणी प्रत्यक्ष बांधकामे सुरू होती. पथकातील अधिकार्यांनी तब्बल १६ ठिकाणी छापे टाकले.
मांगीलाल गुजराल (५ ब्रास), टिव्ही टॉवरजवळ सुरेश खुशलानी (३४ ब्रास), गायत्री शक्तीपीठाजवळ शिवराम कोळी (१० ब्रास), प्रदीप सुधाकर वाणी (६ ब्रास), चिंतामण शिवराम कोळी (९ ब्रास), कृष्णा चैतराम ठाकूर (२४ ब्रास), श्रीराम मंदीराजवळ सुरेश खुशलानी (६० ब्रास), सुरेश सहाणी (१०० ब्रास), रूपेश फालक (६० ब्रास), भूषण एकनाथ पाटील (२४ ब्रास), मनिष जैन (२० ब्रास), संजय चौधरी याच्या समोरील जागेत (६ ब्रास), पिंपळाचे झाडा जवळ गायत्री शक्तीपीठाजवळ (२० ब्रास), पप्पू रतनसिंग पाटील (७५ ब्रास), पराग भोळे (८ ब्रास), कैलास महाजन (४० ब्रास) असा एकूण ५०२ ब्रॉस अवैधरीत्या वाळूचा साठा मिळून आला आहे.



