जिल्हा संघाचा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग ; आरोग्य मंत्री टोपेंच्या हस्ते सामन्याची सुरुवात :

भुसावळ :-महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची १८ वी राज्यस्तरीय सब ज्युनिअर गटाची टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेला जालना येथे शुक्रवारपासून सुरूवात झाली. स्पर्धेत जिल्ह्य संघांने सहभाग घेतला असून आरोग्यमंत्री तथा जालना चे पालकमंत्री राजेश टोपे यांनी यांच्या हस्ते जालना विरुद्ध अहमदनगर सामन्याची सुरुवात टाँसने करण्यात आली, पावसामुळे सामना अनिर्णीत राहिला.
याप्रसंगी राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे संघटनेचे सचिव डॉ.मोहम्मद बाबर, उपाध्यक्ष बाबूलाल धोत्रे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे टेनिस क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, नाशिक जिल्ह्याचे सचिव मुकुंद झंन्कार , लक्ष्मण इंगळे सर, श्म्स परवेज ,आयोजनही कमिटीचे पदाधिकारी अक्षय पवार, बबन सुरटी अँड अमजद पठाण जालना चे सचिव चांद पी.जे.विविध जिल्हा संघटनेचे सचिव व खेळाडू या प्रसंगी उपस्थित होते.

स्पर्धेत राज्यभरातील ३२ संघाने सहभाग घेतला असून स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात येत आहे, स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी केली जाणार आहे.
तत्पूर्वी खेळाडूंना मैदानात येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन टोपे यांनी या वेळी दिले असून दरवर्षी जालना येथे स्पर्धा योजना करण्याचे आयोजकांना सूचना केल्या.

जिल्ह्याचा संघ असा

शोन बोदडे (कर्णधार) तुषार बेहरानी (विकेटकीपर) दिवेश पाटील, , प्रथमेश पाटील, शोएब खान, प्रथमेश पाटील, समर्थ पाटील, कुणाल परदेशी, अथर्व डोंगरे, हर्षकं वाघोदे, पियुष चव्हाण, पार्थ काबरा, वरूण सुशलाणी, ज्ञानेश राणे, यश राणे, जय जैन. तन्मय दाभाडे (प्रशिक्षक) अबुजर पटेल (व्यवस्थापक)