भुसावळ : भुसावळ तालुका पोलीस ठाणे अंतर्गत साकरी गावात दारुविक्रीचा परवाना नसताना अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई करून अंदाजे २३, ७७५ /रूपयाचा , अवैध दारू साठा जप्त करण्यात यश मिळवले आहे
तालुक्यातील साकरी गावी महेंद्र आनंदा बोदर हा त्याचे राहते घरी अवैध दारु विक्री करत
असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली यानुसार वाघचौरे यांचे आदेशानुसार महेंद्र आनंदा बोदर साकरी याचे घरी सहा. पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण यांच्यासह पो हे कॉ
रमण सुरळकर, पो ना यासीन सत्तार पिंजार यांनी संशयीत आरोपी महेंद्र आनंदा बोदर यांच्या घराच्या
हॉलमधील पलंगाचे आडोश्याला देशी विदेशी दारूच्या बाटल्या मिळुन आल्या त्यामध्ये मंजु,दिशेन, टेंगो, बॉबी संत्रा, एम.एल, डॉक्टर ब्रॅन्डी व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की,mpra,SSICe,12J,
पैदल,मॅकडॉल नं.01 व्हिस्की,canon, किंग फिशर , हायवर्ड, गोवा कंपनीचा विदेशी दारूच्या बाटल्या एकूण 23 हजार 775 रूपयाचाअवैध साठा मिळून आल्यामुळे पोलिस कर्मचारी संकेत अरुण झांबरे यांचे फिर्यादिवरुन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 66 ई प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.



