भुसावळ : भुसावळ पालिकेच्या माध्यमातून ३६५ दिवस पाणीपुरवठ्यासाठी ८०६ रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली जाते. या हिशेबाने एका दिवसाच्या पाणीपुरवठ्यासाठी २ रुपये २० पैसे मोजावे लागतात. असे असले भुसावळकरांना वर्षभरात दररोज नव्हे, तर आठवड्याआड एक दिवस म्हणजेच वर्षभरातून ५२ दिवस पाणीपुरवठा होतो. प्रतिदिन २ रुपये २० पैशांच्या हिशेबाने वार्षिक ११४ रुपये ४ पैसे होतात. पालिका प्रशासन मात्र ८०६ वार्षिक पाणीपट्टी वसूल करते. म्हणजेच भुसावळकरांना एका वर्षभरात ६९१.०६ पैसे अतिरिक्त मोजावे लागत आहेत.

भुसावळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सन १९५८ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा योजना उभारली. अत्यंत शुद्ध, तिसऱ्या माळ्यावर व मीटरद्वारे पाणीपुरवठा होणारी ही यंत्रणा आता कोमात गेली आहे. पालिकेने या योजनेवर १९८२ मध्ये ताबा मिळवला होता. नंतरच्या कालात भविष्यकालीन नियोजन न झाल्याने सध्या तापी नदी उशाला असूनही भुसावळकरांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. तरीही पालिकेकडून वार्षिक ८०६ रुपये पाणीपट्टी आकारली जाते. जेवढे दिवस पाणीपुरवठा, तेवढीच पाणीपट्टी आकारल्यास पाणीपुरवठा होणाऱ्या ५२ दिवसांच्या हिशेबाने केवळ ११४.०४ पैसे पाणीपट्टी हवी. पालिका मात्र ८०६ रूपये वसूल करते.
पाणीपट्टी ८०६ रुपये, वर्षभरात फक्त ५२ दिवस पाणी, ६९१ रुपयांचा भुर्दंडआता कोमात गेली आहे. पालिकेने या योजनेवर १९८२ मध्ये ताबा मिळवला होता. नंतरच्या कालात भविष्यकालीन नियोजन न झाल्याने सध्या तापी नदी उशाला असूनही भुसावळकरांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. तरीही पालिकेकडून वार्षिक ८०६ रुपये पाणीपट्टी आकारली जाते. जेवढे दिवस पाणीपुरवठा, तेवढीच पाणीपट्टी आकारल्यास पाणीपुरवठा होणाऱ्या ५२ दिवसांच्या हिशेबाने केवळ ११४.०४ पैसे पाणीपट्टी हवी. पालिका मात्र ८०६ रूपये वसूल करते.
हद्दीबाहेरील भागांना दुप्पट पाणीपट्टी
शहरात हद्दीबाहेरील विस्तारीत भागात पाइपलाइन टाकून पालिकेने पाणीपुरवठ्याची सोय केली आहे. मात्र, या भागात आठ दिवसांआड पाणी मिळते. शिवाय दुप्पट म्हणजेच १६१२ रुपये पाणीपट्टी आकारली जाते. प्रांतांच्या अखत्यारित येणाऱ्या अनेक भागांमध्ये पाइपलाइन नाही.
जुन्या पाइपलाइनला वारंवार गळती
जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता कमी असल्याने एकाच वेळी सर्व शहराला पाणीपुरवठा शक्य होत नाही. शहरात केवळ तीन जलकुंभ आहेत. ते भरण्यासाठी जास्त वेळ लागतो. दुसरीकडे जलवाहिन्या ४० वर्षांपूर्वीच्या असल्याने वारंवार गळती लागते. परिणामी पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. वॉटर फिल्टरेशन, ट्रिटमेंट, वितरणचे खर्च अधिक आहे. मुळात वार्षिक ८०६ रुपये पाणीपट्टी तुलनेत अत्यंत कमी आहे. पाणीपट्टी वाढवली तरी हरकत नाही, पण २४ तास सात दिवस शुद्ध पाणी द्यावे. सध्या भुसावळाकरांना कोणत्याही प्रकारची शास्त्रशुद्ध प्रक्रिया न करता पाणी मिळते. त्यामुळे अनेक जलजन्य आजारांना आमंत्रण मिळते. शिवाय पाणीपुरवठा योजनेचे एनर्जी, वॉटर ऑडिट करणे गरजेचे आहे. सुरेंद्र चौधरी, आजीव सदस्य, इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन, मुंबई
सतीश देशमुख, पाणीपुरवठा अभियंता, नगरपालिका भुसावळ
विरोधाभास : पाणी आहे, यंत्रणा तोकडी
पालिकेने तापी नदीत बांधलेल्या बंधाऱ्यात आताही समाधानकारक जलसाठा आहे. मात्र, पालिकेची यंत्रणा तोकडी आहे. या यंत्रणेद्वारे तासाभरात केवळ ११ लाख लिटर पाणी उचलणे शक्य होते. म्हणजेच २४ तासांत २ कोटी ६४ लाख लिटर पाणी उचल होते. यापैकी गाळ वाहून नेण्यासाठी किमान ५ ते ७ टक्के पाणी वापरले जाते. उर्वरित पाण्यातून शहराच्या एक सप्तमांश भागाला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो.
1 पालिकेची रॉ वॉटर पंप, वितरण प्रणालीतील वीजपुरवठ्याचे बिल प्रतिवर्ष किमान २ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत असते. मुळात कमी पाणीपट्टी असूनही ती शहरात वसुली होत नाही.
2 जलशुद्धीकरण केंद्रावर क्लोरिनेशन, अॅलम प्रक्रिया, लिकेज दुरुस्ती, अास्थापनेवर मोठा खर्च होतो. हा खर्च पाणीपट्टी वसुलीतून होत नाही.
3 शहराच्या दृष्टीने ८०६ रुपये वार्षिक पाणीपट्टी कमी आहे. अमृत योजने नंतर पाणीपट्टी वाढेल, पण शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळेल.
4 जुनी यंत्रणा असल्याने क्षमता कमी आहे, म्हणून पाणी असूनही दररोज पुरवठा शक्य नाही. टप्प्याटप्याने पाणीपुरवठा करावा लागतो.
पालिकेचा तापीतील बंधारा असा तुडुंब भरलेला आहे.


