किन्ही ग्राम पंचायत बोगस भरती प्रकरण : चौकशी होऊनही अहवाल मिळेना, मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार :


भुसावळ – तालुक्यातील किन्ही ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बोगस भरती प्रकरणी एकदा सोडून दोन वेळा चौकशी झाली असल्यावर आजपर्यंत ग्रामसेवक पंचायत समिती ला अहवाल देत नसून उमेदवार हर्षल बोंडे, हर्षल येवले व अश्वजित मोरे यांनी दिनांक 7 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांच्या कडे निवेदन दारे लेखी तक्रार द्वारे निवेदन दिले .

चौकशी झाल्यावर दोन दिवसात ग्रामसेवक यांनी पंचायत समितीला अहवाल सादर करावा असा आदेश भुसावळ गटविकास अधिकारी यांनी देऊन सुद्धा ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला न जुमानता केराची टोपली दाखवली आहे. सदर अहवाल अजूनही पंचायत समिती मार्फत आजपर्यंत मिळत नाही ? यात नेमकं काय गौडबंगाल आहे ? पंचायत समिती चे अधिकारी ग्रामसेवका कडून मुद्दाम अहवाल मागवय नाहीत का.?असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी या बोगस भरती प्रकरणाची सखोल चौकशी करावी व संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी हर्षल बोंडे, हर्षल येवले, अश्वजित मोरे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे केली आहे.