जळगावात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले :

जळगाव – शहरातील एका भागात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात राहणारे १२ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. रविवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुकानावर मटन घेऊन येते असे सांगून बारा वर्षे मुलगी घराबाहेर पडली.

दुपारी उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरू केली. दरम्यान सायंकाळी घरी न आल्याने मुलीच्या नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.