भुसावळ –
भारतात जगभरातून तक्षशिलेत दहा हजारापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते. या ठिकाणी ६० पेक्षा जास्त विषय तर ९ मिलीयन पेक्षा जास्त पुस्तकांचा ज्ञान कोष या ठिकाणी उपलब्ध होता. परंतु या विद्यापीठाला नंतर ऱ्हासाला सुरूवात झाली. पूर्वी अायुर्वेदातील भट्टयांच्या माध्यमातून प्रयोग शाळा होत्या.ऋगवेदात विज्ञान सामवलेले आहे. वेदकालीन गुरू, आत्रेय, धन्वंतरी कश्यप यामधे आजचे आधुनिक विज्ञान व वैद्यकीय क्षेत्र सामावले असुन जगाला विज्ञानाची शिकवण भारताने दिली असल्याची माहिती औरंगाबाद येथील डॉ. रंजन गर्गे यांनी दिली.
डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती तर उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटरच्या वर्धापन दिना निमित्त उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटर व रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचीन भारतीय वैज्ञानिकांचे योगदान या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट चे महाराष्ट्र ़डायरेक्टर सुनिल वानखेडे, नॅशनल कॅन्सील ऑफ टिचर सायन्स चे नॅशनल सेक्रेटरी संदिप पाटील, रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष डॉ. संजू भटकर, भुसावळ चे शिक्षक परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष प्र.ह.दलाल, मुख्याध्यापक संघाचे राज्यध्यक्ष जे.के.पाटील शिक्षक परिषदेचे उपजिल्हाध्यक्ष सुरेश अहिरे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. रंजन गर्गे म्हणाले की, चरक यांनी आयुर्वेदाचे व अॅनाटॉमीचे जणक, कणाद यांनी अणुचा सिध्दांत मांडला, आर्यभट्ट यांनी आर्यभट्ट सिध्दांत मांडला, वराह मिहीर हे फादर ऑफ अॅस्ट्रॉनॉमी, ब्रम्हगुप्त अलजेब्रा मधील संकल्पना जगाला दिल्या, नागार्जुन हे केमीस्ट, पतंजली यांनी योग विद्या दिली, भारद्वाज व भास्काराचार्य यांनी उपनिषद आणि वेदांचे सिध्दात मांडले, रामानुजन यांनी आधुनिक भारतीय विज्ञानाचे बिजारोपण केले. या भारतीय ऋषीमुनींचे ग्रंथ वाचल्यास आताचे आधुनिक विज्ञान या ठिकाणी सापडत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगेश इंगळे यांनी तर आभार जीवन महाजन यांनी केले.

सर्वांसाठी विज्ञान
दररोजच्या जीवनात जगत असताना विज्ञानाचा आपण वापर करत असतो. या विज्ञानाची प्रचीती विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या संकल्पना मुर्त होतील. तसेच विद्यर्थी आनंदाने विज्ञान शिकतील यासाठी प्रत्येक रवीवारी ऑनलाइन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी छोटे प्रयोग स्वत: विद्यार्थी करून बघतात व त्यामागील विज्ञान समजुन घेत असतात. यासाठी विज्ञान सर्वांसाठी या कार्यक्रमाची सुरूवात केली आहे. ..
डॉ.चंद्रमोली जाेशी, अध्यक्ष रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाऊंडेशन गुजरात.
शैक्षणिक जनजागृतीवर भर –
एकवीसाव्या शतकात पदार्पण करत असताना विज्ञानाच्या जोरावर आज आपण अनेक वस्तुंचा वापर करून कमी वेळेत अधिक काम करत आहे. परंतु सदरचे विज्ञान अद्यापही ग्रामीण भागात पोहचले नाही. यामुळे रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या माध्यमातून येणाऱ्या वर्षभरात शैक्षणिक जनाजागृती कार्यक्रम आयोजनावर भर असणार आहे. ….
डॉ. संजू भटकर, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली.


