भुसावळ – कोविड १९ महामारीच्या पार्श्वभूमिवर सर्वांसमोर अतीशय बिकट व दयनीय परिस्थिती उद्भवली होती ,यावेळी लावण्यात आलेले लॉकडाऊन मुळे सर्वच हताश व निराश झाले होते मात्र या संकटावर न डगमगता मात करून घरात राहणाऱ्या गृहिणीचा आनंद टिकवून त्यांना आत्मनिर्भर करण्याकरीता त्या खचून न जाता इम्युनिटी वाढवन्याकरीता भुसावळातीलल्या 55 वर्षा पासुन सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिला क्रिडा मंडळ भुसावळ, यांच्या तर्फे लॉक डाऊन मध्ये विविध प्रकारच्या ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या.

यात संगीत खुर्ची, स्पर्धा ही घेण्यात आल्या होत्या सर्व स्पर्धांचे बक्षिस वितरण डॉ. निलीमा नेहेते यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा सौ. आरती चौधरी यांनी प्रास्ताविक केले, त्यात त्यांनी स्पर्धां विषयी सविस्तर माहिती दिली.
क्रिडा मंडळ महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवित असतात व या पुढे ही असेच कार्य करीत राहणार आहे. असे सौ. आरती चौधरी यांनी सांगितले.
डॉ.सौ निलीमा नेहेते यांनी सांगितले की शारिरीक स्वास्थासाठी नियमित कोणताही व्यायाम आवश्यक आहे. जर स्त्री निरोगी असली तर कुटुंबाचे आरोग्य उत्तम असते. या वेळी मंडळाच्या उपाध्यक्ष लता होसकोटे, कोषाध्यक्ष, जयश्री ओक तसेच, स्वाती नाईक, सुनिता पाचपांडे, प्रभा पाटील, प्रगती ओक. प्राची राणे, अनिता कवडीवाले, डॉ. संज्योत पाटील, विणा ठाकूर, वैशाली भगत, दिपा सोनार, वैशाली ब-हाटे, माधुरी गव्हाळे हजर होत्या. स्वागतगीत सौ. राजश्री कात्यायनी व सुत्रसंचलन संजीवनी पिंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रगती ओक यांनी केले.
भारती चौहान, नेहा नाईक, धनश्री भिरुड, डॉ उर्मी ठक्कर या मंडळीं बाहेर च्या महिलांना बक्षिसे मिळाली. तर जयश्री दवे स्वाती नाईक, सौ पिंगळे, सौ.लता होसकोटे प्रगती ओक, जयश्री ओक, यांना बक्षिसे देण्यात आली. अतिशय सुरेख असा कार्यक्रम शासनाचे नियम पाळून करण्यात आला


