शिवाजी नगर येथे वारंवार लाईट जात असल्याने व्होल्टेज कमी मुळे नागरिक त्रस्त: संबंधित विभागाचे दुर्लक्ष ; रहिवाश्यान तर्फे निवेदन:


भुसावळ –

येथिल वार्ड क्रंमाक १२ मधिल शिवाजी नगर येथे वारंवार लाईट जात असल्याने व्होल्टेज कमीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे.याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे
रहिवाश्यान तर्फे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पावडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
म.रा.वि.वि.कं.लि.चे नियमित
ग्राहक असुन नियमीत लाईट बिल भरतो. मात्र काही .महिन्यापासून वार्ड क्रंमाक १२ मध्ये दररोज रात्री वारंवार लाईट जात असते. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यात मोठ्य प्रमाणात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे व्होल्टेजचे प्रमाण कमी
असल्याने लहान मुले व वयोवृध्दा सुध्दा त्याचा त्रास सहन करावा लागतो.त्याचप्रमाणे आजारी लोकांना सुध्दा त्यामुळे त्रास होत असतो. रात्री लाईट जात असलल्याने चोऱ्या
सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्री लाईट कधीही येते व त्यात व्होल्टेज सुध्दा कमी होत असल्याने घरातील
वस्तु , साहित्य सुध्दा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाईट गेल्यानंतर विभागात फोन केला तर तेथे कोणीही फोन सुध्दा उचलत नाही. असा नेहमीचा त्रास होत असल्याने रहिवा त्रास होत आहे.
संबंधित विभागाने याबाबींची योग्य ती तपासणी करून जो काही फॉल्ट असेल
ती दुरूस्त करून रहिवाश्यांना नियमित विज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आल.अन्यथा जो पर्यंत
सदरील त्रास बंद होत नाही तो पर्यंत दरमहा लाईट बिल भरणार नाही अशा ईशारा रहिवाश्यांनी निवेदना द्वारे दिला आहे. निवेदनावर गौरव राजेंद्र वाघ, हर्षल कापडे,रेहान अली,समीर महोमद,रफिक शेख,चेतन मेहते ,आकाश अग्रवाल,प्रवीण भोसले,आशिष जाधव,विशाल अग्रवाल,महोमद जुबेर,
नदीम शेख,अशोक पवार,थितू मेहरा,नेहाल यादव,तुषार पवार,अभिषेक देवपूजे,
नितीन वाघ,आकाश निकम,
नितीन गोरे, वेभव बर्गे, वरून अग्रवाल, चेतन मेंढारे, आदीच्या स्वाक्षऱ्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *