भुसावळ विभागातील 91 कर्मचारी सेवानिवृत्त ;

भुसावल –

रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन दिनांक 30 जुन रोजी 91 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले, सेवानिवृत कर्मच्यार्याना रेल्वे तर्फे तत्काल 27 कोटी रुपये ऑन लाइन त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोरोना च्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्यांचा यथोचित सन्मान वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमा द्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणुन बुरहानपुर, खंडवा,चालीसगाव, भुसावल, मुर्तिज़ापुर, बडनेरा,मनमाड, अकोला इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत. तसेच मंडल रेल प्रबंधक कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचार्यांना वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी श्री एन.डी.गांगुर्डे यांच्या हस्ते पी.पी.ओ फोंल्डर देन्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी श्री विरेंद्र वडनेरे यांनी केले.
सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री विवेक कुमार गुप्ता व अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी श्री एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित करुन पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे धन्यवाद मंडल कार्मिक अधिकारी श्री दिलिप खरात यांनी केले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी सेटलमेंट आणि लेखा विभागातील कर्मचारी तसेच सर्व कल्याण निरीक्षक आदिंनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *