भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष सलंग्नित प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय संघटना तर्फे नामदार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त ३० जुन ते ५ जुलै हा “समाजहित- समाजभान ” हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे .
या अंतर्गत समाजहित जोपासण्याकरिता विकासदादा घुगे ,कृष्णांत दादा गायकवाड , कृष्णादादा बोदेले ,
यांचे मार्गदर्शनानव्ये व सौ राजश्री नेवे यांच्या सौजन्याने
जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात येत आहे . या सप्ताहातंर्गत दिनांक 3 जुलै शनिवार रोजी सकाळी ११ ते २ या दरम्यान मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात येत आहे .
स्थानिक ब्राम्हण संघाजवळ नेत्रम आय हॉस्पिटल येथे आयोजित या शिबिरात तज्ञ डाक्टर नेत्र तपासणी करणार असून कोविड १९ च्या पार्श्वभूमिवर त्रीसूत्री नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे , तरी जास्तीत जास्त गरजूनीं शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय संघटना
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ राजेश्री उमेश नेवे यांनी केले आहे .



