भुसावळात शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवभोजन केन्द्रातर्फे गरीब गरजुंना मिष्ठान्न व धान्य वाटप ;


भुसावळ –
भुसावळात शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवभोजन केन्द्रातर्फे
कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत(नमा)शर्मा यांनी मिष्ठान्न वाटप करून साजरा केला .
यानिमित्त शिवभोजन केंद्र पूर्णपणे भगवामय करण्यात आले होते सकाळी 8 वाजता बाळासाहेब यांच्या प्रतिमेस जेष्ठ शिवसैनिक योंके हस्ते माल्यार्पण करण्यात आले तदनंतर शिवभोजन केंद्रात गोर-ग़रीब गरजू लोकांना वरण , भात,चपाती, मटर-पनीर,रसगुल्ला, गावराणी तुपातील बेसन लाडू असे मिष्ठान्न जेवण शिवथाळी मध्ये देण्यात आले.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबध्द शिवसेना पक्ष प्रमुख शांत, संयमी, अभ्यासू, खंबीर नेतृत्वात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र शासन महाविकास आघाड़ी सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय संकट समयी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वचनपुर्ति म्हणजे 5 रुपयात जेवण शिवभोजन (शिव थाळी) ही योजना लॉकडाउनच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सुरू केली. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले .
भुसावळला मागच्या वर्षी 27 तारखेला शिवभोजन केंद्र महाराष्ट्र राज्य पाणी-पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगांव जिल्हा पालकमंत्री ,शिवसेना नेते ना.ग़ुलाबराव पाटिल यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार शिवभोजन केंद्र जळगांव जिल्ह्यातील निवड करुन सुरु करण्यात आले होते .शिवभोजनामुळे
गोर गरीब व गरजू यांचे भरभरून आशीर्वाद शिवसेनेला मिळत आहे भुसावळला वर्षभरात या सुमारे 80 हजार गरजू लोकांनी या योजनेचा लाभ घेतला .
भुसावळ रेल्वे जंक्शन असल्याने प्रवासी, भिकारी, बेघर लोकांची भरपूर वर्दळ असते दर रोज़ 190 लोकांना जेवण देण्यात येते सध्या 3 महिन्या पासून शिवभोजन फ्री आहे .
अशी माहिती शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत(नमा)शर्मा यांनी यावेळी दिली.
तसेच यानिमित्त गरीबांना धान्य वाटप करण्यात आले 3 किलो गहु वाटप करण्यात आले.
या प्रसंगी विलास मुळे, उत्तम सुरवाड़े(सर), विजय सुरवाड़े, निलेश महाजन आदि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *