भुसावळात केंद्र सरकारच्या निगमीकरण नितीच्या पुतळ्याचे दहन – शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
देशातील ४१ आयुध निर्माणींचे निगमीकरण करण्याचा प्रस्ताव सरकारद्वारे घेण्यात आला आहे. या निर्णयाचा संयुक्त संघर्ष समितीने केंद्र शासनाच्या या निर्णयाचा तिव्र निषेध नोंदवत शनिवारी आयुध निर्माणी प्रवेशव्दारासमोर केंद्र शासनाच्या निगमीकरण नितीच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात तिव्र निदर्शने करण्यात आली.
निगमीकरण नितीचे पुतळा दहन
देशाच्या संरक्षण क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या आयुध निर्माणीचे निगमीकरण करण्यात आले आहे. या निर्णयाच्या विरोधात संरक्षण क्षेत्रात कार्यरत ऑल इंडिया देफेन्स एम्पलॉइज फेडरेशन( एआडीईएफ), इंडियन डिफेन्स नॅशनल वर्कर फेडरेशनच्या (आयएडीडब्लूएफ ) व भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ (बीपीएमएस) च्या राष्ट्रीय संयुक्त संघर्ष समितीद्वारे निषेध नोंदवण्यात आला. संघर्ष समितीने निगमीकरण निर्णयानंतर तात्काळ आंदोलन करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार भुसावळ आयुध निर्माणीत शुक्रवारी काळे फीते, निदर्शने केल्यानंतर शनिवारी भारत सरकारच्या निगमीकरण नितीचा पुतळा दहन करण्यात आला. तर रविवारी संयुक्त संघर्ष समिती आयुध निर्माणी भुसावळ च्या माध्यमातून निगमीकणाचा पुतळा जाळला. यावेळी आयुध निर्माणी प्रशासन व पोलीस प्रशासन भुसावळ शहर यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी संयुक्त संघर्ष समितीचे प्रमुख वक्ते जेसीएमचे सदस्य दिनेश राजगिरे, किशोर चौधरी, किशोर सूर्यवंशी आदींनी मनोगत व्यक्त केले. दीपक भिडे, किशोर बढे, जितू आंबेडकर, मधुकर राऊत, राहुल पाटील, संजय अहिरे, जावेद तडवी आदींसह सर्व पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
आज अनिश्चित संपावर निर्णय
सरकारच्या विरोधात आयुध निर्माणी निगमिकरणाचा निषेध नोंदविला. पुढे अनिश्चित कालीन संपावर जाण्याचा निर्णय तिन्ही फेडरेशनचे नेते रविवारी होणाऱ्या संयुक्त बैठकीत घेणार आहेत. याबाबतही यावेळी कामगारांना सांगितले गेले. यामुळे आता आयुध निर्माणी कामगारांचा संघर्ष वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *