आता आठवड्यातून सहा दिवस धावणार; बोईसर व दहानू रोड स्थानकांवरही मिळणार थांबा भुसावळ (प्रतिनिधी) - रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोयीसुविधांचा विचार करून गाडी क्रमांक 19003/19004 दादर–भुसावळ खान्देश एक्सप्रेसच्या फेऱ्या त्रि-साप्ताहिक ऐवजी आठवड्यातून सहा दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था दि. 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. सदर गाडी प्रत्येक शुक्रवारी वगळता आठवड्यातील उर्वरित सहा दिवस धावणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी या गाडीला बोईसर आणि दहानू रोड स्थानकांवर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. *गाडी क्रमांक 19004 भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस दि. 1 ऑगस्ट 2026 पासून भुसावळ येथून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या सहा दिवसांमध्ये धावेल. *गाडी क्रमांक 19003 दादर–भुसावळ खान्देश एक्सप्रेस दि. 1 ऑगस्ट 2026 पासून दादर येथून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या सहा दिवसांमध्ये धावेल. थांबे - बोरीवली, विरार, पालघर, बोईसर, दहानू रोड, वापी, वलसाड, नवसारी, भेस्तान, चलथाण, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव आणि जळगाव या स्थानकांवर थांबेल. महत्त्वाची सूचना - सध्या 09051/09052 दादर–भुसावळ त्रि-साप्ताहिक स्पेशल या क्रमांकाने चालविण्यात येणारी गाडी दि. 1 ऑगस्ट 2026 पासून 19003/19004 दादर–भुसावळ खान्देश एक्सप्रेस या नियमित गाडी क्रमांकाने चालविण्यात येईल. प्रवाशांनी गाडीचे वेळापत्रक, थांबे व डब्यांची संरचना यासंबंधीची सविस्तर माहिती [www.enquiry.indianrail.gov.in](http://www.enquiry.indianrail.gov.in) या संकेतस्थळावर पाहावी, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.



