महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मुदत वाढ; निलेश कोलते ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना महामारीने राज्यात सध्या थैमान घातले आहे. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असून विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर केले परंतु अर्ज सादर करतांना अनेक अडचणी आल्या होत्या. भुसावळ राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष निलेश कोलते यांनी अर्ज स्वीकारण्याची मुदतवाढ द्यावी अशी मागणी विभागाकडे केली होती.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे ३० जून २०२१ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी प्रणाली मार्फत राबविल्या जातात. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांमध्ये विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व फ्रिशिपकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मे देण्यात आली होती.
मात्र, कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. हे निदर्शनास येताच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मुदत वाढ दिली आहे. तसेच या योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता पात्र असूनही अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी या मुदतवाढीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही निलेश कोलते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *