भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा भयंकर प्रादुर्भाव संपूर्ण जगाला बघायला मिळत आहे. भारतातही कोरोना दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळे आता जगात कोरोना पासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे उपाय सुचवले जात आहेत. त्यातील सर्वात एक उत्तम उपाय म्हणजे म्हणजेच विशिष्ट मर्यादेत सकाळ-संध्याकाळ पाच पाच मिनिट वाफ घेणे आणि गरम पाणी पिणे . वाफ घेतल्याने आणि गरम पाणी पिल्याने कोरोना आजारात खुप फरक पडतो असं अनेक तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. कोरोना चे प्रमुख लक्षण म्हणजे ताप सर्दी खोकला आणि न्यूमोनिया. दरम्यान डॉक्टर सर्दी किंवा कफ झाला की वाफ आणि गरम पाणी घेण्याचा सल्ला देतात. कारण वाफ घेतल्यामुळे आपल्या नाकातील आणि गळ्यातला म्युक्स ज्यामुळे कप तयार होतो पातळ होतो. तसेच आपल्या शरीरात कमी झालेला यांचे प्रमाण वाढतं. त्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेता येतो.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार म्हणण्यानुसार covid-19 च्या विषाणूला नाक आणि तोंडाद्वारे गरमकोमट पाणी आणि वाफ सकाळ-संध्याकाळ पाच पाच मिनिट घेतल्यास covid-19 च्या विषाणू ला मारण्या साठी उपयोग होतो . जर पूर्ण भुसावळ सहजळगाव जिल्ह्यामध्ये आणि देशांमध्ये, शहरांमध्ये,खेड्यांमध्ये, मोहल्ले, वस्त्यांमध्ये नागरिकांनी आपल्या कुटुंबासह एक साथ, एक सप्ताह दररोज सकाळी आणि रात्री झोपताना पाच पाच मिनिट वाफ आणि गरम-कोमट पाणी पिल्यास नक्कीच आपण कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून वाचू शकतो आणि त्या विषाणूचा नक्कीच नायनाट करू शकतो. यासाठी समस्त नागरिकांनि दिनांक 1मे 2021 ते 7 मे 2021 या दरम्यान साई निर्मल फाउंडेशन आयोजित वाफ सप्ताहात कुटुंबीयांसह दररोज सकाळ संध्याकाळ पाच पाच मिनिट वाफ आणि गरम पाणी पिऊन कोरोना विषाणूचा समूळ नायनाट करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर दिनकर जावळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले होते व. जे नागरिक कुटुंबिय याबाबत सप्ताहामध्ये सहभागी होऊ इच्छित असतील अशांनी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या संपर्क क्रमांकावर, एस एम एस द्वारे, मिस्ड कॉल द्वारे, कॉमेंट्स द्वारे संपर्क करून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. संस्थेच्या या आवाहनाला प्रतिसाद देत एकूण दोन हजार 130 नागरिकांनी या वाफ सप्ताहात सहभागी झाले होते. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदर उपक्रमाचे प्रकल्पप्रमुख चंद्रशेखर पाटील,सहाय्यक प्रकल्प प्रमुख एडवोकेट सागर सरोदे,नरेंद्र बऱ्हाटे.
पुष्पाताई सरोदेपाटील ( जळगाव), दिव्यांक पाटील, आर के कोळी,देवेंद्र राजपूत, कपिल पहुरकर, मोहन कासार, सुरेश बऱ्हाटे, आदींनी सहकार्य केले परिश्रम घेतले. या उपक्रमात नागरिकांच्या सक्रीय सहभागामुळे, उत्साहाने उस्फुर्त प्रतिसादामुळे सदर अभियानाच ब्रीद, होऊन सहभागी वाफ सप्ताहात…., कोरोना मुक्त करू भारतास जगतात!!! हळू हळू यशस्वी होताना दिसत आहे.
.



