भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेतील जंक्शन म्हणून ओळख असलेल्या भुसावळ रेल्वे स्टेशनला चारही दिशेने गाड्यांची ये जा सुरु असते ओघाने प्रवाशांची वर्दळ असते. या रेल्वेगाड्यांमधुनन फुकटा प्रवास करून आलेले अनेक भिकेरी वा वाटसरु व गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे परिसर,बस स्टँड तसेच नगरपालिका हद्दीत ठाण मांडून बसलेले आहे . सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा उद्रेक वाढत आहे . अश्या परिस्थितीत यां विळख्यात अनेक जण अडकले असून या भिकारयांचे वाली कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला . याकरीता
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या भिक़ारी यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली.
. दरम्यान शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, लोहमार्ग पोलीस स्टेशनचे सुरेश सरडे,सपोनि कृष्णा भोये,हरिष भोये,स.फौ. माणिक सपकाळे,पोना नेव्हील बाटली,गोपनीय विभागाचे संदीप परदेशी तसेच पोलीस कर्मचारी,होमगार्ड अशांनी भुसावळ शहरातील,रेल्वे स्टेशन परिसरातील तसेच बस स्टँड भागातील एकूण ६० भिकारी एकत्र जमा करून त्यांची तपासणी केली . तसेच सर्वांची नावे व पत्ते लिहून घतले तसेच दोन दिवसांच्या आत आपल्या गावी निघून जा अश्या सूचना देत नाही गेल्यास कारवाई करण्यात येणार असा इशाराही डीवायएसपी यांनी यावेळी दिला.त्यानंतर सर्व भिकारी यांना जेवण देण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांना खरा उद्देश गुन्हेगारीवर आळा बसावा व तरुण पिढी व्यसनापासून मुक्त व्हावी यासाठी असला तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या अनुषंगाने रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली असल्याचे यावेळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले .



