भुसावळ (प्रतिनिधी )-
उच्च माध्यमिक वर्ग इयत्ता 12 वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत आहे. ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असून असून अनेक महाविद्यालयांमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी ऑनलाईन पूर्व परीक्षा घेतल्या जात आहे. प्रत्यक्षिक परीक्षेचे जनरल सबमिशन व सर्टिफाय करणे बाबत कार्य सुरू आहे. अनेक कनिष्ठ प्राध्यापक बंधू-भगिनी वाड्या वस्त्यांमध्ये व उपनगरांमध्ये सर्वेक्षणाचे कार्य करीत आहे. अशा परीस्थितीत कनिष्ठ प्राध्यापकांना अजून कोविड लस दिली गेली नाही. ऑफलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांना समवेत कामकाज करावयाचे आहे.यापूर्वी कोविडमुळे अनेक शिक्षकांचा मृत्यू झालेला आहे झाला असून शासनाकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. कोविड आजाराची जोखीम स्वीकारली जात नाही, कोणतेही विमा कवच नाही त्यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. कोविड सेंटरवर ड्युटी दिल्यामुळे कोविड प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे शिक्षकांच्या अशा ठिकाणी ड्युटी देऊ, नये अशी मागणी जिल्हा कनिष्ठ प्राध्यापक संघटनेनतर्फे करण्यात आली आहे
कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील सोनार, सरचिटणीस प्रा.शैलेश राणे, कार्याध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, प्रा.सुनील पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, प्रा.डी.डी.पाटील, उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र तायडे, प्रा.पी.पी.पाटील, प्रा.संजय पाटील, प्रा.राजेश बडगुजर, प्रा.जी.एच.वंजारी, प्रा.शरद पाटील, प्रा.जितेंद्र पाटील, प्रा.अतुल इंगळे, प्रा.राजेश भटनागर, सहसचिव प्रा.डी.डी.भोसले, प्रा.राजेंद्र चव्हाण, प्रा.डी.जे.चिकटे, प्रा.शैलेश पाटील, कोषाध्यक्ष प्रा.सुधाकर गोसावी, प्रा.बी.एस.बोरसे, प्रा.आर.आर.उपाध्ये, कार्यकारणी सदस्य प्रा.संदीप पाटील, प्रा.अरुण राठोड, प्रा.एस.एच.चौधरी, प्रा.संदीप पाटील (पारोळा), प्रा.देवेंद्र वानखेडे, प्रा.धनराज भारुडे, प्रा.एस.झेड.पाटील, प्रा.किरण कुलकर्णी, प्रा नरेंद्र गायकवाड, प्रा.अनिल सोनवणे तसेच महिला प्रतिनिधी प्रा.स्मिता जयकर, प्रा.रेखा पवार, प्रा.मनीषा देशमुख, प्रा.भारती महाजन व क्रीडा प्रतिनिधी प्रा.राजेश अंजाळे व प्रा.मनोज वारके यांनी केली आहे.



