भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ तालुका वंचित बहजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले प्रसंगी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यातआले .
वंचित बहुजन आघाडी भुसावळ तालुका तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, दिल्ली येथे देशातील शेतकरी भुतो न भविष्यती आंदोलन करीत आहे.केंद्र सरकारने लॉकडॉऊनच्या काळात शेती संबंधी तीन नविन कायदे चर्चा न करता संसदेत असलेल्या संख्या बळाच्या आधारावर मंजुर करून घेतले या नविन विधायकामुळे भारतीय शेतकरी अक्षरशः राबवला जाणार असुन तो देशोधडीला लागणार आहे.जागतिकीकरण आणि त्या मागुन अपरिहहार्य पणे येणाऱ्या खाजगीकरणातुन शेतकऱ्यांचा शेतमाल कवडी मोलाने विकत घेण्याची मुभा आणि त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी गिळगृत करण्याचा राजमार्ग या नविन विधेयकात आहे
.दिल्ली शेतकरी आंदोलन सुरू आहे त्याला पाठींबा म्हणून आम्ही 5 मार्च2021 रोजी
मागण्या महाराष्ट्रातील आघाडी सरकार मधील सर्व पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिलेला आहे. महाआघाडीची ही भूमिका प्रमाणिक असेल तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरूस्ती करणारा अध्यादेश ताबडतोब काढावा व विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकन्यांच्या शेत मालाला किमान आधारभूत किंमत (हमी भाव) मिळावा या साठी कायद्यात स्पष्ट तरतुद करावी आणि त्याची कठोर अमलबजावणी करावी.

शेतक-याच्या शेतमालाची वाहतुक करण्यासाठी मुख्यतः भारतीय रेल्वेचा वापर होता या भारतीय रेल्वेचा खाजगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे.खाजगीकरणामुळे शेतमालाची वाहतुक प्रचंड खर्चीक होईल व सर्व सामान्य ग्राहकांवर वाढीव भावाचे ओझे लादले जाईल. रेल्वेच्या खाजगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने ताबडतोब रद्द करावा . दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या आमच्या शेतकरी बांधवांच्या आंदोलनाने भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाला व मोदी सरकारच्या सर्व सार्वजनिक सेवांच्या खाजगीकरणाला विरोध करण्याची भुमिका घ्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने ककेले5 असून शेतकरी आंदोलनाला सक्रिय पाठींबा देत आहेत
.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे , वंचित बहुजन आघाडी, संतोष कोळी , तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी गणेश इंगळे भुसावळ तालुका सचिव
बंटि सोनवणे युवा आघाडी देवदत्त मकासरे
बालाजी पठाडे वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन जिल्हा चिटणीस रुपेश कुऱ्हाळे कुणाल सुरडकर सतिष बिऱ्हाडे तालुका उपाध्यक्ष सचिन सोनववणे आदि उपस्थित होते .


