यावल ( प्रतिनिधी ) –
येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपुर्ण जगासह देशात थैमान घालणाऱ्या कोरोना बिषाणु संसर्गाच्या संकटा समयी खबरदारीचा उपाय म्हणुन शासनाच्या वतीने महामारीचा प्रादुर्भाव टाळ्ण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांनी विविध नियमांचे काटेकोर पालन करावे या दृष्टीकोणातुन प्रसारमाध्यमातुन आपले जिव धोक्यात घालुन जनजागृतीचे उल्लेखनिय असे कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने . म.न.से. जिल्हा अध्यक्ष चेतन अढळ कर यांनी आज मराठी दिनाचे औचित्य साधुन पत्रकार शब्बीर खान यांचा सत्कार करून पत्रकार अय्युबपटेल , पत्रकार सुनिल . गावडे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर व आदी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवुन गौरविन्यात आले .
यावेळी श्याम पवार, अनिल सपकाळे,बाळु माळी,गौरव कोळी, रुषिकेश कानडे ,आदी उपस्थित होते.



