मोटरसायकलवरील तिघानी तरुणाचा मोबाइल हातोहात केला लंपास ; जळगावातील घटना ;


जळगाव –
फोन करण्याच्या बहाण्याने मोटर सायकलवर असलेल्या ट्रीपल सीट चोरांनी मोबाइल घेवून पोबारा केल्याची घटना जळगाव येथील डी मार्टच्या एक्झीट गेट समोर घडली .या प्रकरणी रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
डी मार्टच्या एक्झीट गेट समोरिल रोडवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास तीन अज्ञात इसम फॅशन हिरो कंपनीच्या मोटर सायकलवरुन आलेत व त्यातील एकाने सोहम गणेश कोळी वय 18 राहणार, जीवननगर जळगाव या तरुणास फोन करण्यासाठी मोबाइल मागितला म्हणून सोहम कोळी याने त्याचा मोबाइल दिला आणि क्षणात मोटर सायकल असलेल्या त्या ट्रीपल सीट चोरांनी मोबाईल घेवून लागलीच पळून गेले याबाबत सोहम कोळी याने तक्रार दिली असून पोलिस तपास करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *