भुसावळ –

जिल्हाधिकारी जळगाव यांनी नाईट कर्फ्यु संदर्भात लागू केलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणीसाठी रविवारी रात्री पोलीसांसह, पालिका कर्मचारी यांच्या पथकांच्यावतीने संपूर्ण भुसावळ शहरामध्ये पेट्रोलिंग करण्यात आली.
पेट्रोलिंग दरम्यान ज्या आस्थापना दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करताना आढळून आल्या अशा आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्यात जामनेर रोड वरील हाॕटेल प्रीमिअरच्या मालकांना 5000/- रुपये , फेमस डेअरी 1000 रुपये आणी
हाॕटेल वैष्णवीला 2000 रुपये अशा एकूण तीन आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ शहर पोलीस स्टेशन यांच्या वाहनांवरून सर्व नागरिकांना उद्घोषणाद्वारे नाईट कर्फ्यूच्या अंमलबजावणी बाबत सूचना देण्यात येत आहे तसेच या नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात येणार असल्याने सर्व नागरिकांनी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवारकर ,निरिक्षक महेंद्र कतोरे , पोकॉ संकेत झांबरे, पो कॉ.विशाल सपकाळे, अशांनी मिळून केली.


