कोरोनाचा फैलाव : जिल्हाधिकारी कारवाईसाठी उतरले रस्त्यावर

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढल्याने रविवारी स्वतः जिल्हाधिकारी अभिजित राऊत कारवाईसाठी रस्त्यावर उतरल्याने शहरात खळबळ उडाली. रविवारी शहरातील हॉटेल कमल पॅराडाईज, दापोरे मंगल कार्यालय, यश लॉन या ठिकाणी जिल्हाधिकार्‍यांनी सरप्राईज व्हिजीट करीत नियमांचे उल्लंघण करणार्‍या मंगल कार्यालय चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्याने खळबळ उडाली आहे. शासनाचे नियम झुगारून शहरातील मंगल कार्यालयात होणार्‍या लग्न सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *