अंतुर्ली फाटयावर २२ लाखाचा गुटखा जप्त ; जळगांव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ;


  • मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ब-हाणपुर मुक्ताईनगर रोड वरील अंतुर्ली फाटा बस स्टॉप जवळ एका महेंद्रा बोलेरो पिकअप मालवाहु गाडीमधून सुमारे 22 लाख रुपये किमतीचा गुटखा पान मसाला जळगांव स्थानिक गुन्हे शाखेने आज कारवाई केली असून याप्रकरणी तिघाविरुद्ध कारवाई करण्यात आली असून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
    जळगांव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली की, 19 रोजी ईच्छापुर कडुन अंतुर्लीकडे एक महेंद्र बोलेरो पिकअप माल वाहुतुक गाडीमध्ये गुटखा येत आहे.त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे,अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, पोहेकॉ.अश्रफ शेख, सुनिल दामोदरे,जितेंद्र पाटील, प्रितमकुमार पाटील,दिपक पाटील,दिपक शिंदे,दिपक चौधरी अशांना तात्काळ रवाना केले होते गोपनीय बातमी नुसार वरील पथकाने मुक्ताईनगर अंतुर्ली फाटयावर बस स्टॉप जवळ सापळा रचला असता ईच्छापुर कडुन एक महेंद्रा बोलेरो पिकअप मालवाहु पांढ-या रंगाची गाडी 11.40 वाजेदरम्यान अंतुर्लीकडे वळतांना दिसली.सदर गाडी थांबवून तपासणी केली असता गाडीत सुमारे २१,२२,७२० रुपये किमतीचा माल मिळुन आला .
    दरम्यान गाडीतील इसमांची अधिक चौकशी केली असता गाडी मालक गजानन पांडुरंग दहीकर रा.टुनकी बु.संग्रामपुर जि.बुलढाणा यांची गाडी असुन त्यातील गुटखा माल सुध्दा त्यांचाच असल्याचे गाडी चालक गोविंदा विश्वनाथ राऊत वय-२१ , क्लीनर गोविंदा सुभाष आखरे वय- २१ यांनी
    सांगितले .यावरुन महाराष्ट्र राज्यात गुटखा, सुगंधी सुपारी,पानमसाला,खर्रा,मावा व तत्सम पदार्थ याची निर्मीती, साठवण,वितरण,वाहतुक व विक्री करण्यास प्रतिबंधीत केलेले असतांना चोरीने वाहतूक करणाऱ्या आरोपी गाडी चालक गोविंदा विश्वनाथ राऊत , क्लीनर गोविंदा सुभाष आखरे व गाडी मालक गजानन पांडुरंग दहीकर रा.टुनकी बु.ता.संग्रामपुर जि.बुलढाणा यां तीघां विरुद्ध
    मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे भाग -५ गुरन ५५/२०२१ भादवि.कलम २७२,२७३,३२८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *