शिव जयंती निमित्ताने के.पी.सी.फाऊंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबीर ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भुसावळ येथील कन्हैय्यालाल प्लाँट भागातील के.पी.सी फाऊंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरात महिलांनी देखील सहभाग घेतला होता . 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून खारीचा वाटा उचलला .
देशावर तसेच महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचे संकट आलेले आहे .त्यामुळे प्रत्येकाला रक्ताची गरज भासत आहे . आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले असुन खारीचा वाटा उचलला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद धनगर यांनी म्हटले आहे .
यावेळी अध्यक्ष उल्हास महाजन प्रदीप चौधरी विनीत हंबर्डीकर , नेहाल लढे , दीपक चौधरी , प्रमोद महाजन धीरज पाटील,शिवम चौधरी,अजित बोंडे,रोशन सोनवणे, आकाश महाजन,निखिल धनगर, सुशांत धांडे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *