वरणगाव –
गेल्या काही दिवसा पासुन ग्रामीण भागात कोरोना काहीसा शांत झाल्याने नागरिकानी या महामारीतून थोडी उसंत घेतल्याची जाणीव होवू लागली होती मात्र पुन्हा या आजाराने डोके वर काढल्याने याचे लोन ग्रामीण भागात पोहचत असल्याचे दिसत आहे .
आयुध निर्माणीच्या दोघा कोरोनाची लागन झाली आहे तर नगर परिषदेने मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही केली

वरणगाव आयुध निर्माणीचे दोघा उच्चपदस्थअधिकाऱ्याना कोरोनाची लागन झाली असून एकास उपचारासाठी मुबंई येथे हलविण्यात आले आहे तर दुसऱ्यास जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती तर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व प्रतिबधकासाठी नगर परिषदेने सायंकाळच्या सुमारास बस स्थानक चौकात मास्क न लावणाऱ्या नागरिकावर 100 रूपये प्रमाणे दंडात्मक कारवाही करण्यात आली आहे
जिल्ह्यात कोरोनाचा
प्रार्दुभाव वाढत असल्याने नागरिकानी पुर्वीप्रमाणेच दोघात समाजअंतंर ठेवावे, नाका तोंडावर मास्क, घालावे व सॅनिटायझरचा वापर करावा ,विना कारण घराबाहेर पडू नये , हात साबनाने धुवावे अशी खबरदारी घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे


