भुसावळ (प्रतिनिधी )

खासदार रक्षा खडसे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रावेर-पातोंडी-पिंप्रीनांदू-डोलारखेडा-कुर्हा वढोदा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 20 कोटींच्या निधीची मागणी केली होती.
परंतु कोरोनामुळे टप्प्याटप्प्यात निधी देण्यात येत असल्यामुळे या रस्त्याला 20 कोटींऐवजी 10 कोटींची रक्कम तत्वतः मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून डोलारखेडा फाटा ते कुर्हा दरम्यान रस्त्याचे करण्यात येणार आहे.


