भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार करण्यात आला मात्र आरोपीने लग्न न करता पीडीतेची फसवणूक करून तो कुठेतरी निघून गेल्याने पीडीतेने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका भागातील 29 वर्षीय तरुणीवर संशयीत आरोपी राम सदाशीव सपकाळे (मूळ रा.भानखेडा, ता.भुसावळ, ह.मु.माहित नाही) याने 1 जानेवारी 2015 ते 2 ऑक्टोबर 2020 दरम्यान लग्नाच्या आमिषाने शारीरीक संबंध प्रस्थापीत केले मात्र संशयीत पीडीतेला सोडून कुठेतरी निघून गेल्याची व फसवणूक झाल्याची पीडीतेची खात्री झाल्याने तिने शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे करीत आहेत.



