भुसावळात वीज कंपनी सहा.अभियंत्यास मारहाण –


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहा.अभियंता तुषार हिंगणे यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गांधी नगरात घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास वीज कंपनीचे सहायक अभियंता तुषार हिंगणे हे गांधी नगरातील फालक नगरातील रहिवासी तुषार स यांच्या घरी थकीत वीज बिल वसुलीसाठी गेल्यानंतर सुरे आणि वीज कंपनीचे अधिकारी यांच्यात शाब्दीक चकमक होवून हिंगणे यांना मारहाण करण्यात आली. वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना मारहाण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे झोनल सेक्रेटरी दत्तात्रय न्हावकर व पदाधिकार्‍यांनी केली. सहायक पोलिस अधीक्षक अर्चीत चांडक यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *