भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून सर्वानी शासनास सहकार्य करून त्रिसूत्री राबवून आपल्या लाडक्या रायाचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने शहर व परिसरात ठिकठिकाणी साजरा केला .
*अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा भुसावळ* तर्फे
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
प्रसंगी रेल्वे स्टेशन परिसरातील भव्य अश्या अश्वारूढ पुतळयाचे पूजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाउपाध्यक्ष गोविंदा पाटिल यांचे हस्ते पूजन करण्यात येवून माल्यार्पण करण्यात आले . यावेळी सामाजिक कार्यकर्ते जे बी कोटेचा , नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती मुकेश गुंजाळ , प्रा नाना पाटिल , प्रा डॉ जगदीश पाटिल , महेंद्र पाटिल , प्रतापराव पाटिल ,राजेन्द्र निकम, मधुकरराव हिंगणे, विनोद जाधव , राहुल पाटिल , डी के पाटिल , रविन्द्र चौधरीं , साहेबराव पाटिल , ज्ञानेश्वर जगदाळे , सचिन डेलीवाला, कैलास डिडवानी ,राजू आवटे , किरण पाटिल , एडव्होकेट तुषार पाटिल , महिला पादाधिकारी अलका भगत , यांचेसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांनी सुद्धा महाराजांचे पुतळयास त्रिवार मुजरा करून माल्यार्पण केले .



