भुसावळात आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या –


भुसावळ (प्रतिनिधी )-
फुफ्फुसाच्या आजाराला कंटाळून संजय भीमराव महाले (56) यांनी गुरूवारी तापी नदीच्या पूलावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शहरातील रेल्वे हॉस्पीटलमागील डॉ. आंबेडकर नगरातील रहिवासी महाले हे मजूरी करीत असलेतरी त्यांना दारू पिण्याची सवय होती. त्यातच त्यांना फुफ्फुसाचा आजार झाला होता. त्या आजारास कंटाळून त्यांनी गुरूवारी तापी नदीच्या पूलावरून पश्चिमेकडील बाजूकडे पूलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी तत्काळ पोलिस गाडी पाठवून मृतदेह बाहेर काढला. महाले यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचा भाऊ महेद्र महाले यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *