खासदार रक्षा खडसेंना कोरोनाची लागण ; ट्विट करुन दिली माहिती ;


जळगाव –
रावेर मतदार संघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली असून कोरोनाबाबतची माहिती स्वतः खासदार रक्षा खडसे यांनी ही माहिती ट्विट करुन दिली आहे. रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता रीपोर्ट पॉझीटीव्ह आल्याचे खासदारांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे. गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यानीं स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी तसेच माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. गत महिन्यात माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, मुलगी अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. आता खासदार रक्षा खडसेंचा कोरोना अहवाल पॅाझीटीव्ह आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *