भुसावळ (प्रतिनिधी )-

तालुक्यातील दर्यापूर गृप वरणगांव फॅक्टरी ग्रामपंचायत सरपंचपदी अपक्ष सुशिला राजेश शेटे यांची तर उपसरपंचपदी मधुकर प्रधान यांची निवड झाली आहे . बुधवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात निवड पार पडली , यात सरपंचपदाच्या निवडणूकीत ११. मते सुशिला शेटे यांना मिळाली ६ मते कुसुम गायकवाड यांना मिळाली , उपसरपंच पदी मधुकर प्रधान यांची निवड झाली आहे ,
दर्यापूर ग्रामपंचायतमध्ये विजयी झालेले ९ सदस्य सहलीवर गेले होते , पाच वर्षात पाच सरपंच व उपसरपंच असे नियोजन या सदस्यामध्ये झाल्याचे वृत असुन सध्या तरी कोणत्याही पक्षाचे नेतृत्व यांच्या कडे नाही सर्व पक्षीय पध्दतीने कार्यभार आज स्वीकारला आहे
यावेळी पं स विस्तार अधिकारी अनिल सुरळकर यांच्या उपस्थीत हि निवडणुक पार पडली


