अंतर्नाद प्रतिष्ठान व शिक्षण विभाग, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन भव्य महावक्तृत्व स्पर्धचे आयोजन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
अंतर्नाद प्रतिष्ठान व
शिक्षण विभाग, पंचायत समिती, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भुसावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन भव्य महावक्तृत्व स्पर्धा २०२१ – सालाबादप्रमाणे यावर्षी (वर्ष ४थे ) सुद्धा विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व गुणाचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, बाहेर आपले विचार मांडण्याची संधी मिळावी,छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची रुजवात व्हावी या उदात्त हेतूने भुसावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन भव्य महावक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे .
भुसावळ तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागासाठी पुढील सूचना दिलेल्या आहेत कृपया त्यानुसारच आपला सहभाग स्पर्धेत नोंदवावा.
स्पर्धेचे गट आणि विषय गट क्र.१ :- इ.३ री ते ५ वी
(कालावधी 3 मिनिट )
विषय
अ) शिवराज्याभिषेक
ब) जिजाऊंचा शिवबा
क) मी बाल शिवाजी बोलतोय
गट क्र.२ :- इ ६ वी ते ८ वी*
(कालावधी ४ मिनिटे)
विषय
अ) शिवरायांची युद्धनीती
ब) छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक
क) छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गड किल्ले
गट क्र. ३ :- इ ९ वी ते १२ वी
(कालावधी ५ मिनिटे)
विषय
अ) महिलांचा आदर करणारे शिवराय
ब) शिवरायांचे जलव्यवस्थापन
क) बहुजननायक छत्रपती शिवाजी
गट क्र. ४ :- खुला ( कुणीही – वय, व्यवसायाची अट नाही)
(कालावधी ७ मिनिटे)
विषय
अ) शिवरायांचे धर्मनिरपेक्ष धोरण
ब) छत्रपती शिवाजी महाराज एक मॅनेजमेंट गुरु
क) छत्रपती शिवाजी महाराज यांचे कृषी धोरण व आजचा शेतकरी
गट निहाय संपर्क प्रमुख
(YouTube लिंक गटानुसार खालील नंबरवर पाठवावी.)
गट क्र. १ (३ री ते ५ वी )
गट प्रमुख : समाधान जाधव ९०२२४६४९८१
गट क्र. २ (६ वी ते ८ वी )
गट प्रमुख : वंदना भिरुड
९५६१९५०८११ , गट क्र.३( ९ वी ते १२ वी ) , गट प्रमुख : जीवन महाजन ७५८८८१५३८४ ,
गट क्र. ४ ( खुला गट )
गट प्रमुख अमित चौधरी ९४२१७४१८२४
सदर स्पर्धेच्या अटी व नियम
१) स्पर्धेकरता ४ गटांची निर्मिती करण्यात आलेली असून गटनिहाय वक्तृत्वाचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. दिलेल्या कालावधीतच आपले वक्तृत्व सादर करायचे आहे.
२) वक्तृत्वाचे तीन विषय गटनिहाय देण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक विषय स्वेच्छेने निवडून त्यावर वक्तृत्व सादरीकरण करावे.
३) सभाधीटपणा, हावभाव, विषयाची मांडणी, आवाजातील चढ उतार, एकूण परिणामकारकता यावर आधारित गुणदान केले जाईल.
४) स्पर्धकाने आपापल्या गटातील विषयानुसार दिलेल्या कालावधीचा स्वतःच्या आवाजातील सुस्पष्ट व्हिडीओ तयार करून स्वतःच्या किंवा मित्राच्या युट्यूब चॅनलला योग्य माहितीसह अपलोड करावा.
५) युट्युब लिंक पाठवत असताना त्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये विद्यार्थ्याचे नाव, गट क्र., इयत्ता, शाळेचे नाव , गावाचे नाव, मोबाईल नंबर सुस्पष्ट लिहिलेले असावे.
६) खुल्या गटाकरिता स्पर्धकाचे नाव, गट क्र., नोकरी/व्यवसाय, गावाचे नाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर यांचा उल्लेख करावा.
७) व्हिडिओची लिंक आम्ही दिलेल्या गटाच्या संपर्क प्रमुखांच्या व्हाट्सअप मोबाईल नंबरवर पाठवावी. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र नंबर खाली देण्यात आलेला आहे.
८) खाली दिलेल्या लिंकला टच करून प्रत्येक स्पर्धकाने आपली माहिती रजिस्ट्रेशनसाठी पाठविणे आवश्यक आहे.
http://bit.ly/3oYULAl
९) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
१०) २२ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आलेल्या लिंक स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील.
११)प्राथमिक फेरी ऑनलाईन द्वारे झाल्यानंतर अंतीम फेरी बक्षीस वितरणाच्या दिवशी प्रत्यक्षात घेण्यात येइल.
१२) स्पर्धेसंदर्भात काही अडचणी असल्यास गट प्रमुखांशी चर्चा करावी.
पारितोषिक स्वरूप
रोख रक्कम ,आकर्षक स्मृतिचिन्ह, पुस्तक, प्रमाणपत्र, सहभागी स्पर्धकांना सुद्धा सहभागाबद्द्ल प्रमाणपत्र देण्यात येईल.
व्हिडिओ बद्दलची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी https://youtu.be/nGdIfBzHP या
लिंकला टच करून मार्गदर्शक व्हिडिओ जरूर पाहा.
प्रकल्प प्रमुख संजय भटकर (९९२३००५२७६)
प्रकल्प समन्वयक देव सरकटे
(८९८३६१०९१७)
सह समन्वयक राजू वारके (९७३०५५१३२१) तुषार प्रधान , गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, पंचायत समिती, भुसावळ ७७०९९४८०५८
किशोर वायकोळे
( शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग, पंचायत समिती, भुसावळ) ७०५७१५४१५३
संदीप वसंतराव पाटील (अध्यक्ष, अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ.) ७५८८००९४९२, ९२०९२४८३९२.
यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक अंतर्नाद प्रतिष्ठान व शिक्षण विभाग, भुसावळ केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *